ANNOUNCEMENTS
No Announcement
श्रीमती सूनितीदेवी सिंघानिया शाळेच्या मराठी विभागाने इयत्ता ८ वी ( 2L) च्या विद्यार्थ्यांना उपक्रमांतर्गत एक आगळा - वेगळा विषय दिला. विषय होता, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील आदिवासी समाज, त्यांचे राहणीमान, उपजीविकेचे साधन, त्यांनी जोपासलेल्या विविध कला, संस्कृती, परंपरा इत्यादी विषयी सचित्र माहिती आणणे. इथे नमूद करण्यात अत्यंत आनंद वाटतो की विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने, अभ्यासपूर्ण पद्धतीने एका सुंदर पुस्तिकेच्या स्वरूपात उपक्रम सादर केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील आदिवासी समाजाविषयी सखोल माहिती मिळाली. आदिवासी समाजाचा विविध अंगाने अभ्यास झाला. असे नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमीच विद्यार्थ्यांना एक वेगळी प्रेरणा, सकारात्मक दृष्टी, ऊर्जा देऊन जातात.