ANNOUNCEMENTS
No Announcement
भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. आमच्या शाळेमध्ये दिनांक १०/१०/२०२३ ते १३/१०/२०२३ या कालावधीत मराठी विभागातर्फे वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इयत्ता ६ ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यातील विविध पुस्तकांचा आस्वाद घेतला. विविध कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह, लघुकथा वाचनाचा मनमुराद आनंद लुटला. काही विद्यार्थ्यांनी कविता वाचन केले, तर काही विद्यार्थिनींनी संत कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या ओव्या देखील गायल्या. विद्यार्थ्यांचा उत्साहदायी सहभाग वाखाणण्याजोगा होता. डॉ. कलाम यांच्या विचारानुसार ‘एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते’. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने वाचनाचा छंद बाळगावा, अवांतर वाचनाची आवड निर्माण करावी व आपल्या विचारांना समृध्द करावे असा सुंदर संदेश या उपक्रमाद्वारे दिला गेला.