ANNOUNCEMENTS
- The result for Jr.Kg to Std IX admissions for the academic year 2026-2027 is now live Click here to view the results
उभारूया गुढी आनंदाची, सुरुवात करूया नव्या स्वप्नांची. गुढीपाडव्याच्या या शुभदिनी, भरभराट होवो आपणा सर्वांची. गुढीपाडव्याच्या या शुभदिनानिमित्त, आपल्या सुनितीदेवी सिंघानिया स्कूलच्या इयत्ता पहिली व दुसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना गुढीपाडव्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी साजरा केला जातो आणि याच दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरासमोर गुढी उभारण्याची सुंदर परंपरा विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कागद, रंग, स्केचपेन तसेच विविध सजावटीच्या वस्तूंचा वापर करून आकर्षक गुढ्या, पाने आणि सुंदर सजावट तयार केली. या सर्जनशील उपक्रमातून विद्यार्थ्यांची कल्पकता वाढली तसेच त्यांच्या सूक्ष्म हालचालींचा विकासही झाला. हा उपक्रम पार पाडताना विद्यार्थ्यांमध्ये आनंद, चैतन्य आणि उत्साह ओसंडून वाहत होता. गुढीपाडवा साजरा करताना त्यांनी आनंदाने, उत्साहाने आणि जोमाने पुढे जाण्याचा सकारात्मक संदेश दिला.