ANNOUNCEMENTS
No Announcement
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी....
ह्या गाण्याचे स्वर सर्वत्र दुमदुमत असतात... तो दिवस म्हणजे २७ फेब्रुवारी! 'मराठी भाषा गौरव दिन' हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्म दिवशी साजरा केला जातो. श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया शाळेमध्ये 'समृद्ध महाराष्ट्रातील वैभव महोत्सव' ह्या संकल्पनेवर आधारित सोहळा साजरा केला. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्ध्यानी अतिशय सुंदर प्रकारे खेळाच्या माध्यमातून विविध मराठी उपक्रमांचे प्रदर्शनात सादरीकरण केले. जसे.... प्राणी ( ओळखा पाहू मी कोण?), फळे ( रसाळ चव कुणाची), शरीराचे अवयव( माझे नाव सांगा पाहू) गंमत - जंमत अक्षरांची,जंतर मंतर व्याकरणाचे इत्यादी...तसेच आपल्या पारंपरिक खेळाची ओळखही आमच्या छोट्याश्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक खेळ दाखवून केली. जसे - भातुकली, गोटया, भोवरा, विटी - दांडू इत्यादी.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी विविध खेळांचा आनंद घेतला.