ANNOUNCEMENTS
No Announcement
"मराठी भाषेचा गोडवा साखरेहूनी फार, मऊ मखमली असली, तरी शब्दांना तिच्या धार वळवावी तशी वळते, सगळ्यांना कळते भाषेची आमच्या श्रीमंती अपार" मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! खरंतर मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. म्हणूनच मराठी भाषा जतन करण्यासाठी व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कुसुमाग्रज्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत श्रीमती. सुनितीदेवी सिंघनिया शाळेत प्रेरणादायी भाषणे व काव्यवाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेली भाषणं काळजाला भिडणारी होती तर काव्यवाचनाने अंगावर शहारेच आले होते. या कार्यक्रमाला इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रेक्षक म्हणून उस्फुर्त प्रतिसाद दिला. अशा प्रकारे मराठी भाषा गौरव दिन आमच्या शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.