ANNOUNCEMENTS
No Announcement
आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नव वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे आणि हीच परंपरा कायम ठेवत सुनितीदेवी सिंघनिया शाळेतील विद्यार्थ्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने संकल्प केले. तसेच भेटकार्ड तयार करुन एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व एक नव्या पर्वाकडे वाटचाल करण्याची सुरवात केली.