ANNOUNCEMENTS
No Announcement
गुढी पाडवा अर्थात हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा, शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.
यंदा हा सण ९ एप्रिल २०२४ रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांनी "एक ताजेपणा, एक नाविन्य, नवीन वर्षात करू काही नाविन्यपूर्ण" हे उद्दिष्ट मनाशी बाळगून अतिशय कलात्मक आणि सुबक अशी चित्रे काढली व आपला नवीन वर्षाचा संकल्प त्यावर लिहून तो या पुढे पाळण्याचे वचन स्वतःला दिले.