ANNOUNCEMENTS
Admission for Nursery for the academic year 2024 – 2025 stands closed.
महाराष्ट्रात दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा आहे आणि हीच परंपरा कायम ठेवत मराठी भाषा जतन करण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी श्रीमती सुनितीदेवी सिंघनिया शाळेत विविध उपक्रमांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये पुढील विषयांचा समावेश करण्यात आला होता.
इयत्ता ३ री द्वितीय भाषा- चौदाखडी खेळ
इयत्ता ३री तृतीय भाषा- विरुद्धार्थी शब्द खेळ
इयत्ता ४ थी द्वितीय भाषा- तमसो मा ज्योतिर्गमय (ज्योत), अक्षराची सापशिडी
४ थी तृतीय भाषा - ग्रह आणि वारांच्या नावांची गंमत
इयत्ता ५ वी द्वितीय भाषा - व्याकरण - म्हणी (ओळखा पाहू कोण?), सव्यये scrap book
इयत्ता ५ वी तृतीय भाषा - मात्राचक्र, नाम - नावात काय आहे? पण नावात बरेच काही आहे....
सर्वांनी आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी या प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद दिला व प्रदर्शनचा मनमुराद आनंदही घेतला.