ANNOUNCEMENTS
- The result of the online applications made for admission to classes Jr. KG and Sr. KG will be announced online on 2nd January, 2026.
- The result for Nursery Admission for the Academic Year 2026–27 is now live. Click Here
२७ फेब्रुवारी 'मराठी भाषा गौरव दिन' तसेच प्रसिद्ध कवी, लेखक, नाटककार कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा आमच्या शाळेत थोड्या वेगळ्या पद्धतीने हा विशेष दिवस साजरा करण्यात आला. 'समृद्ध महाराष्ट्रातील वैभव महोत्सव' ह्या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम ६ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण पद्धतीने, कल्पकतेने व उत्साहाने प्रदर्शनात सादर केले. विविध संकल्पनांनी सजलेले हे उपक्रम डोळ्याचे पारणे फेडून गेले.
इयत्ता सहावी द्वितीय भाषा - महाराष्ट्रातील तिर्थस्थाने अष्टविनायक, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर यांची माहिती
इयत्ता सहावी तृतीय भाषा - ग्रामीण, शहरी व चंद्रावरची शाळा यांची 3 D प्रतिकृती
इयत्ता सातवी द्वितीय भाषा - ऐतिहासिक वास्तू रायगड किल्ला, शनिवार वाडा, गेटवे ऑफ इंडिया स्मारके यांचा इतिहास, रचना आणि संवर्धन
इयत्ता सातवी तृतीय भाषा - महाराष्ट्रातील पक्षी व प्राणी अभयारण्य - कर्नाळा अभयारण्य, नान्नज माळढोक अभयारण्य, ताडोबा अभयारण्य
इयत्ता सातवी तृतीय भाषा - बाल साहित्य
इयत्ता आठवी द्वितीय भाषा - पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती, बोलीभाषा, पोशाख, जेजुरीचे प्रसिद्ध दैवत खंडोबाचा उत्सव इयत्ता आठवी तृतीय भाषा - महाराष्ट्रातील मानक चिन्ह शेकरू-राज्य प्राणी, हरियाल- राज्य पक्षी, आंबा-राज्य फळ , मुद्रा-राज्य प्रतीक, ताम्हण-राज्य फूल, ब्ल्यू माॅरमाॅन-राज्य फुलपाखरू, जय जय महाराष्ट्र माझा-राज्यगीत
इयत्ता नववी द्वितीय भाषा - मराठी संतसाहित्य, संतपरंपरा, संतांचे राहणीमान, लोककला, लोकसंगीत, दशावतार, गोंधळ, अभंग
इयत्ता नववी तृतीय भाषा - मराठी साहित्य वृक्ष, कविता प्रवास, कथेचे आणि लोककथेचे प्रकार, इंडो युरोपियन भाषाकूलाची रचना - मराठी भाषेचा उगम, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ अशा बहुरंगी व विविधतेने नटलेल्या अभिनव प्रयोगांनी सजलेला हा 'समृद्ध महाराष्ट्रातील वैभव महोत्सव' सोहळा खरंच सगळ्यांना समृद्ध करुन गेला. विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून प्रदर्शनाची रंगत वाढवली.